पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लक्ष्मी वैभव न्युज, शिव सृष्टी न्युज

इमेज
बुलेट ट्रेन जिरायती भागातून जावी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे*   इंदापूर:-   मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन बाबत सध्या हालचाली सुरू झाल्या असून ही ट्रेन इंदापूर तालुक्यातील बागायती पट्ट्यातून जाणार आहे.त्यामुळे तालुक्यातील शेती उद्ध्वस्त होणार असल्याने शेतकऱ्यांचा विरोध होत आहे.त्यामुळे सदरची ट्रेन पर्यायी मार्गाने जावी अशी आपण केंद्राकडे मागणी करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.           सध्या इंदापूर तालुक्यातील सणसर,भवानीनगर परिसरातून बुलेट ट्रेनच्या सर्चेचे काम सुरू आहे.यामध्ये तालुक्यातील बागायती जमीन हस्तांतर होणार असून शेकडो नागरिकांची राहती घरे मोडली जाणार आहेत.तसेच तालुक्यातील निरा डावा कालव्याला याचा धोका होणार आहे.साहजिकच या तालुक्यातील शेती अडचणीत येणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांकडून या प्रकल्पास विरोध होत आहे.त्यामुळे आपण माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून सदरचा प्रकल्प अन्य पर्यायी मार्गाने पूर्ण करण...