पत्रकार संघाने वृक्षारोपण केलेल्या झाडांना मुलाप्रमाणे जपा - शर्मिला पवार इंदापूर(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या माध्यमातून वडापुरी गावातील प्रत्येक कुटुंबाला मिळालेल्या झाडांना,हे झाड म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्य आहे.असेच म्हणजे मुलाप्रमाणे जपून ते झाड पूर्ण क्षमतेने वाढू द्या.आगामी काळात आनंद मिळेल.असा आशावाद शरयू फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ, इंदापूर तालुका यांच्या वतीने इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे शरयू फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ शर्मिला पवार यांच्या हस्ते '२२ हजार वृक्ष लागवड' संकल्पाच्या अंतर्गत शनिवार (ता.२४ ऑक्टोबर)रोजी फळझाडे लागवड करण्यांंत आली.त्यावेळी शर्मिला पवार बोलत होत्या. इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे,पुणे जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे...