गरीबी निर्मूलन समितीतर्फे महिला बचतगटांना कर्जमाफी देण्यासाठी तहसीलदारांना निवेदन पुणे : दौंड तालुक्यातील गावांमध्ये गरीब महिलांचे अनेक बचतगट कार्यरत असून त्या माध्यमातून महिला कामधंदा करत घरखर्चासाठी आर्थिक मदतीची तरतूद करत असतात. अशातच काही खाजगी व सरकारी बँका त्यांना कर्ज देतात. सदर कर्जफेड या महिला आपापल्यापरीने करत असतात. तालुक्यातील अशाच महिला बचत गटांनी काही खाजगी व सरकारी बँकांकडून कर्ज घेतले असून त्याचा हप्ता या महिला फेडतही आल्या आहेत. परंतु, सध्याच्या कोरोनाच्या जागतिक महामारीच्या संकटामुळे अनेक उद्योगधंदे बंद झाल्याने कष्टकरी महिलांचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे सद्यपरिस्थितीत गरीब महिला बँकांचे कर्ज वा हप्ते फेडण्यास असमर्थ आहेत. याबाबतीत महिलांनी बँकांना अनेकदा विनवणी करूनही त्यांचे वसुली अधिकारी सदर महिलांच्या घरी जाऊन बसत आहेत व कर्जवसुलीसाठी दमदाटी करत आहेत. हप्ते फेडा अन्यथा घरजप्ती आणू, पोलीस केस करू, तुमचे नांव काळ्या यादीत टाकू अशा धमक्या देत आहेत. त्यामुळे सदर महिला सध्या मानसिक दडपणाखाली वावरत असून त्यांना आपल्याच घरात अस...