"माझे कुटुंब माझी जबाबदारी" मोहिमेचा कळाशी येथे शुभारंभ.
इंदापूर : प्रतिनिधी
"माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमेचा शुभारंभ कळाशी (ता. इंदापूर ) येथे इंदापूर पंचायत समितीचे सभापती महेंद्र रेडके व कळाशी गावचे सरपंच नामदेव करे यांच्या उपस्थितीमध्ये आज (दि.२४) रोजी करण्यात आला.
या अभियानाअंतर्गत पल्स ऑक्सिमिटर, टेम्प्रेचर गण च्या साह्याने गावातील पहिल्या दिवशी ३७४ कुटुंबांपैकी २७ कुटुंबातील एकूण १९० जणांची तपासणी करण्यात आली असून येत्या पुढील ५ दिवसांमध्ये उरलेल्या सर्व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे सरपंच नामदेव करे यांनी सांगितले.
या मोहिमेत सरपंच नामदेव करे, उपसरपंच गजेंद्र देवकर,ग्रामसेवक प्रमोद पाटील,पोलीस पाटील प्रदीप भोई,डॉ.जाधवर,डॉ.साळुंखे मॅडम,आरोग्य सेवक एम. व्हि. कोळी,डॉ. शिंदे मॅडम व आशाताई सेविका कांबळे यांनी सहभाग घेतला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य युवराज रेडके,तानाजी कांबळे,अहमद शेख,ज्ञानदेव करे,व्यंकट देवकर,गणेश
भांडवलकर, प्रकाश करे, अनिल सूर्यवंशी, बाळासाहेब जाधव, ढुके भाऊसाहेब,सहदेव करे, किसन सूर्यवंशी, बिभीषण करे,फकीर सलमपुरे, विठ्ठल लोखंडे, ग्रामपंचायत कर्मचारी सुजित सूर्यवंशी,आदिनाथ हरणावळ, विजय घाडगे,स्वयंसेवक किरण देवकर व नितेश करे, शिक्षक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा