पाच टीएमसी पाण्यासाठी राज्यमंत्र्यांच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढलेल्या घटनेचा जाहीर निषेध -हणुमंत कोकाटे
इंदापूर:उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला,म्हणून सोलापूर जिल्ह्यातील काही विरोधी पक्षातील कोणी तरी आकसा पोटी, बालीस पणे वागून दत्तात्रय भरणे यांनी केलेला विकास न बगावल्या मुळे हास्यास्पद,स्वयंघोषीत कार्यकर्ते यांनी दत्तात्रय भरणे यांच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढली, व पुतळा नदीत बुडवला, त्या घटनेचा आम्ही इंदापूर तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ऊजनीचे ५टीएमसी पाणी फक्त इंदापूर तालुक्यातील बावीस गावासाठी देण्यासाठी निर्णय झाल्याने विरोधकांच्या बुडाला मिरच्या झोंबल्या आसल्याची माहिती इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तालुकाध्यक्ष हणुमंत आबा कोकाटे व पुणे जिल्हा सरचिटणीस वसंतराव आरडे ,यांनी दिली या वेळी ते म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही हक्काच्या पाण्याला धक्का न लागता हा निर्णय घेण्यात आला आहे, बावीस गावाचा पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, प्रत्येक निवडणुकीत हा प्रश्न व...