पाच टीएमसी पाण्यासाठी राज्यमंत्र्यांच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढलेल्या घटनेचा जाहीर निषेध -हणुमंत कोकाटे

इंदापूर:उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला,म्हणून सोलापूर जिल्ह्यातील काही विरोधी पक्षातील कोणी तरी आकसा पोटी, बालीस पणे वागून दत्तात्रय भरणे यांनी केलेला विकास न बगावल्या मुळे  हास्यास्पद,स्वयंघोषीत कार्यकर्ते यांनी दत्तात्रय भरणे यांच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढली, व पुतळा नदीत बुडवला, त्या घटनेचा आम्ही इंदापूर तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो, 
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून  ऊजनीचे  ५टीएमसी पाणी फक्त इंदापूर तालुक्यातील बावीस गावासाठी देण्यासाठी निर्णय झाल्याने विरोधकांच्या बुडाला मिरच्या झोंबल्या आसल्याची माहिती इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे  तालुकाध्यक्ष हणुमंत आबा कोकाटे व पुणे जिल्हा सरचिटणीस वसंतराव आरडे ,यांनी दिली या वेळी ते म्हणाले की  सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही हक्काच्या पाण्याला धक्का न लागता हा निर्णय घेण्यात आला आहे, बावीस गावाचा पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, प्रत्येक निवडणुकीत हा प्रश्न वादळी ठरायचा, व विरोधक निवडणुकीसाठी सरस ठरायचे पण दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकाराने हा प्रश्न मिटणार आसल्याने आम्ही कोरोना काळ संपल्यावर बावीस गावात गुढ्या उभा करून दत्तात्रय मामा भरणे यांचा जाहिर नागरी सत्कार करणार आसल्याची माहिती त्यांनी दिली, 

चौकट....
इंदापूर तालुक्यातील काही निराशावादी विरोधकांनी आता सोलापूर जिल्ह्यातील काही विरोधी पक्षातील कार्यकर्ते यांच्या त बोटे घालणे बंद करावे, आपणास काही जनतेसाठी करता आले नाही म्हणून इतरांवर कुरघोडी करणे बंद करा आसे मत वसंतराव आरडे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा 

टिप्पण्या

  1. *इंदापूरसाठी पाणी आणलं हा मंञी महोदय यांनी गुन्हा केला नाही.*

    राजकारणी कोणी का असेना ते जर तालुक्यासाठी, तालुक्यातील जनतेसाठी काम करत असतील. आणी त्यांची अंत्ययाञा दुसरे तालुक्याबाहेरील व तालुक्यातील काही मुर्ख मंडळी काढत असतील तर ही इंदापूर तालुक्यातील जनतेची अंत्ययाञा आहे असे जनता समजेल.
    आपल्या तालुक्यातील दोन्हीही नेते मंञीपद भूषवलेले आहेत. किंबहून त्यांनी फुल ना फुलाची पाकळी नक्कीच तालुक्यासाठी कामे केली असतील किंवा करत असतील, त्यामुळे त्या दोन्हीही नेत्यांवर दुसऱ्या तालुक्यातून, जिल्ह्यातून टिका होतं असेल तर आपल्या तालुक्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे...
    तालुक्यातील काही सामान्य लोकांना कुठं राजकारण करावं हे कळंल पाहिजे.. सामान्य शेतकऱ्यांची आपण लेकरं आहोत, शेतीसाठी पाणी हा गरजेचा मुलभूत घटक आहे... आजपर्यत 22 गावे पाण्यासाठी तरमळत होती आज त्यांच्या साठी जर एखादे चांगले काम केले असेल. तर हजारो वर्षाचा ऐतिहासिक निर्णय होवून पाण्या शेजारी राहूनही पाणी न मिळालेल्या शेतकऱ्याला जावून विचारा तो सांगेल पाण्याची किंमत. अशा टिकाकारांना भविष्यात तेथिल जनता किती जवळ करेल हे आपण समजू शकतो....
    तालुक्यात मंञी महोदयांवर बालिश बुध्दीकडून होणाऱ्या टिकेमुळे मंञी महोदयांचे मतदान रुपाने सामान्य जनता पाठिंबा देऊन वजन वाढवेल. तालुक्यातील विरोध्दक जर इतरांच्या टिकेचा आनंद साजरा करत असतील तर या भागातील जनतेनं समजून घ्यावं केवळ तुम्हाला मतदारांना थापा मारून तुमच्या मतांवर थाट साजरा करण्याचा आतापर्यंत प्रयंत्न झालाय. तुम्हाला जाणूनबजून पाण्यासाठी तरमळत ठेवण्यात आलं होतं. मराठीत एक म्हण आहे. मयतांच्या टाळूवरील लोणी खाणारी .......| अशाचं पध्दतीचं राजकारण आतापर्यंत झालंय.
    त्यामुळे मंञी महोदयांच्या टिकेचा व अत्ययाञा काढणाऱ्या मुर्ख बालिश बुद्धीचा मी एक सामान्य नागरीक म्हणून जाहीर निषेध करतो....��
    - मिथुन मिसाळ
    मो. 8830905753
    वरकुटे खुर्द. ता. इंदापूर. जि. पुणे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापुर तालुका के 120 होम्योपैथिक डॉक्टर 16 जुलाई से मुंबई में होने वाले विरोध प्रदर्शन में भाग लेंगे।

राजकारणातील राजहंस दत्तात्रय मामा भरणे

डॉ. संदेश शाह को डॉ. सैमुअल हैनिमैन लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया गया।