इंदापूर : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांपासून भाटघर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेटफळ हवेली येथील ब्रिटिशकालीन तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.परंतु तलावाच्या आऊटलेटच्या दुरुस्तीचे काम न झाल्याने तलावाच्या इतर बाजूंनी पाणी मोठ्या प्रमाणात भराव्यास भगदाड पडून गळती होत असल्याने तलावास धोका निर्माण झाला आहे.
या सर्व प्रकारामुळे शेटफळ हवेली,सुरवड येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
याची माहिती शिवसेना नेते नितीन शिंदे व राजवर्धन पाटील समर्थक श्रीयश नलवडे मिळताच या दोघांनी घटना स्थळी पाहणी केली.
या प्रकाराची माहिती श्रीयश नलवडे यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव व नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांना दिली.राजवर्धन पाटील यांनी पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.धोडपकर साहेब यांच्याशी फोनवरून चर्चा केली असता त्यांनी तातडीने तलावाची पाहणी करण्याकरिता अधिकारी पाठवले. त्याच बरोबर शिवसेना नेते नितीन शिंदे यांनीही कार्यकारी अभियंता श्री धोडपकर यांना या घटनेची कल्पना दिली.
या नंतर दुसऱ्याच दिवशी आऊटलेट च्या कामाला सुरुवात झाली व गळतीचे प्रमाणही थोडे कमी झाले आहे. असे निदर्शनास आले. या कामाबाबत पाहणी करण्यासाठी स्वतः राजवर्धन पाटील हे आपल्या शेटफळ हवेली मधील समर्थकासह तलावावर व गळतीच्या ठिकाणी उपस्थित राहून कामाची पाहणी केली. त्याच बरोबर संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा संपर्क करून या बाबत आणखी माहिती घेतली.व सदरचे काम चांगल्या दर्जाचे करा व हा विषय काळजीपूर्वक हाताळा अश्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
या पाहणीसाठी संचालक राजवर्धन पाटील यांच्या सह उपसरपंच सचिन शिंदे,संजय शिंदे,श्रीयश नलवडे,आकाश कांबळे,अमित निंबाळकर,विलास शिंदे,माऊली चव्हाण, नितीन शिंदे,विजय शिंदे,गणेश देवकर,केशव शिंदे,उपस्थित होते.
====================================
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा