इंदापूर : प्रतिनिधी 

बिजवडी (ता.इंदापूर ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा हंगाम २०२०-२१ चा ३१ वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ आज (दि.२५) रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री तथा कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील,व्हाईस चेअरमन श्रीमती पद्माताई भोसले व सर्व संचालक मंडळ यांचे शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी कारखान्याचे संचालक सुभाष बलभिम काळे व त्यांचा पत्नी सविता सुभाष काळे या उभयंताच्या हस्ते सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. 

याकार्यक्रमादरम्यान कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की,यावर्षी कारखान्यास १४ लाख मे.टन कार्यक्षेत्रातील नोंद बिगरनोंद तसेच कार्यक्षेत्राबाहेरील २ लाख असा एकूण १६ लाख मे.टन ऊस उपलब्ध आहे. गाळप हंगामाकरिता कारखान्याने ५७५ ट्रक व टॅक्टर करार करुन अॅडवान्स चे वाटप केलेले आहे. तसेच ७०० बैलगाडी व ४५० टॅक्टरगाडी करार केलेले असून तोडणी प्रोग्रॅम कॉम्प्युटराईज्ड करणेत येत असल्याने ऊस तोडणी व वाहतुकीसाठी कोणतीही अडचण येणार नाही नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाला असून उजनी धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहे.त्यामुळे यंदा कारखान्यास ऊसाची उपलब्धता मुबलक आहे. गळीत हंगामातील कारखान्याच्या मशिनरी ओव्हरहॉलिंगची सर्व कामे पूर्ण करण्यात आली असून ऊस तोडणी यंत्रणा सज्ज करणेचे काम सुरु आहे. हा हंगाम सर्व ऊस उत्पादक सभासद, कारखान्याचे वाहतुकदार, तोडणी मुकादम व सर्व कामगारांचे सहकार्याने यशस्वी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर कार्यक्रम शासनाचे सर्व नियम, सोशल डिस्टटींगचे पालन करुन संपन्न झाला.

या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक भरत शहा,भास्कर गुरगुडे, विष्णू मोरे, हनुमंत जाधव,मच्छिंद्र अभंग,अंकुश काळे, सुभाष काळे, प्रशांत सुर्यवंशी, यशवंत वाघ,  मानसिंग जगताप, राजेंद्र गायकवाड, राहुल जाधव,  अंबादास शिंगाडे, वसंत मोहोळकर,केशव दुर्गे,अतुल व्यवहारे, राजेंद्र चोरमले,  पांडुरंग गलांडे, सुभाष भोसले,जयश्री नलवडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, व सर्व खाते विभागप्रमुख उपस्थित होते.

==============================

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापुर तालुका के 120 होम्योपैथिक डॉक्टर 16 जुलाई से मुंबई में होने वाले विरोध प्रदर्शन में भाग लेंगे।

राजकारणातील राजहंस दत्तात्रय मामा भरणे

डॉ. संदेश शाह को डॉ. सैमुअल हैनिमैन लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया गया।