धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसिल समोर ढोल वाजवून आंदोलन.
इंदापूर : प्रतिनिधी 
धनगर आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी इंदापूर तालुका धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने आज (दि.२५) रोजी इंदापूर तहसील कार्यालयासमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले.
सरकारने धनगर समाजासाठी २२ सवलती लागू केल्या होत्या.तसेच शेळी मेंढीपालन महामंडळास १००० कोटी जाहिर केले होते. त्याची अंमलबजावणी त्वरीत करावी व आरक्षणासाठी जी फडणवीस सरकारने ठोस पावले उचलली होती.तशी या सरकारने उचलावीत या व इतर मागण्या मान्य करणेसाठी झोपलेल्या सरकारला जाग यावी.यासाठी कृती समितीच्या वतीने तहसिलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माऊली चौरे, विचार मंथन परिवाराचे प्रमुख प्रकाशराव पवार, रामभाऊ पाटील, महेंद्र रेडके, रंजित पाटील,माऊली वाघमोडे,भाऊसाहेब अर्जुन,गणपत करे,बापू पारेकर,तानाजी मारकड,श्रावण चोरमले,बाळासाहेब डोंबाळे,पोपट कचरे,धनाजी देवाकाते,आबासो थोरात,नवनाथ दडस,संतोष देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.

==============================

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापुर तालुका के 120 होम्योपैथिक डॉक्टर 16 जुलाई से मुंबई में होने वाले विरोध प्रदर्शन में भाग लेंगे।

राजकारणातील राजहंस दत्तात्रय मामा भरणे

डॉ. संदेश शाह को डॉ. सैमुअल हैनिमैन लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया गया।