इंदापूर : प्रतिनिधी 
निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील हे इंदापूर तालुक्यातील  बाभुळगाव येथील  दौऱ्यावरती असताना  येथील रहिवाशी असलेल्या भरत रामचंद्र आसबे यांनी नवीन मोटरसायकल घेतली आहे.त्याची पुजा करण्याची विनंती राजवर्धन पाटील यांना केली. राजवर्धन पाटील यांनी नवीन मोटरसायकली ची पूजा केली व त्यांना स्वतः गाडीवरती बसवून राजवर्धन पाटील यांनी त्यांची गाडी चालू करुन त्यांना त्यांच्याच गाडी वरून पूर्ण गावातून चक्कर मारली. यानंतर बाभुळगाव चे युवा कार्यकर्ते सामाजिक कार्यात सतत अग्रेसर आसणारे, अमोलराजे इंगळे यांच्यासोबत  मोटारसायकल चालवण्याचा आनंद घेतला..
 राजवर्धन पाटील हे मोटर सायकल चालवत आहे हे पाहून आसबे यांना खूप आनंद झाला. राजवर्धन पाटील हे तालुक्यात सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात, लोकांना वेळोवेळी मदत करत असतात, त्यांनी तालुक्यातील राजकारणाचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. राजवर्धन पाटील हे तालुक्याच्या राजकारणामध्ये पूर्णपणे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशी सर्वसामान्य जनतेमधून हाक येत आहे. राजवर्धन पाटील म्हणजे आपले हक्काचे नेतृत्व अशी जनतेमध्ये भावना निर्माण झाली आहे तालुक्यांमध्ये काहीही सुखदुःखाच्या गोष्टी असू देत राजवर्धन पाटील तेथे उपस्थित असतात व आपल्या दुःखात आनंदात सहभागी होतात अशी भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे. आज एका सर्वसामान्य माणसाची मोटर सायकल चालवून ते त्यांच्या आनंदात सहभागी झाले आहेत.

या वेळी सॅनिटायझर व मास्कचा वापर करून हा कार्यक्रम पार पडला आहे, कोरोना या महाभयंकर व्हायरस मुळे अनेक जनांना जिव गमवावा लागला आहे, तरी आपण मास्कचा वापर करा आसेही या वेळी राजवर्धन पाटील यांनी सांगितले.

====================================

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापुर तालुका के 120 होम्योपैथिक डॉक्टर 16 जुलाई से मुंबई में होने वाले विरोध प्रदर्शन में भाग लेंगे।

राजकारणातील राजहंस दत्तात्रय मामा भरणे

डॉ. संदेश शाह को डॉ. सैमुअल हैनिमैन लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया गया।