रोटरी क्लब अॉफ इंदापूर व इंद्रायणी डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने "सर्वांसाठी नेत्र सेवा " उपक्रम सुरु.     
                                    

इंदापूर : प्रतिनिधी                                                      
रोटरी क्लब ऑफ इंदापूर व इंद्रायणी डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वांसाठी नेत्र सेवा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.याचा शुभारंभ आज (दि. २७ ) रोजी करण्यात आला.         
 या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना डॉ.आनंदराव खडके यांनी सांगितले की, सध्या देशात व राज्यात कोरोनाजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.अश्या परिस्थितीमध्ये सामाजिक बांधिलकी जाण ठेवून "सर्वांसाठी नेत्रसेवा" या उपक्रमांतर्गत मोफत नेत्र तपासणी आज दि. २७ सप्टेंबर पासून दररोज सकाळी १०.३० ते २.३० यावेळेत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
याचा तालुक्यातील सर्व घटकांतील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.आनंदराव खडके यांनी केले आहे.
रोटरी क्लब इंदापूर अध्यक्ष अजिंक्य इजगुडे,रोटरी क्लब संस्थापक, उपाध्यक्ष संस्थापक उपाध्यक्ष मुकुंद शहा, रोटरी क्लब ऑफ टेंभुर्णी चे एडीजे रो.यशवंत हांडे, रोटरीचे सचिव प्रशांत भिसे, इंद्रायणी नेत्र रुग्णालयाचे नेत्रतज्ञ व शल्यचिकित्सक डॉ.आनंदराव खडके,सौ. डॉ. दिपाली आनंदराव खडके,डॉ.अनिल पुंडे,डॉ.पंकज गोरे, डॉ.लक्ष्मण सपकाळ,डॉ.अनिल पेटकर,रोटरीचे सदस्य संजय दोशी,  नितीन लोंढे, प्रशांत शेटे-पाटील,भीमाशंकर जाधव,अनिल बाबर,सचिन होदाडे, कृषी सहाय्यक हनुमंत बोडके,नरेंद्र गांधी उपस्थित होते.

===============================

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापुर तालुका के 120 होम्योपैथिक डॉक्टर 16 जुलाई से मुंबई में होने वाले विरोध प्रदर्शन में भाग लेंगे।

राजकारणातील राजहंस दत्तात्रय मामा भरणे

डॉ. संदेश शाह को डॉ. सैमुअल हैनिमैन लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया गया।