इंदापूर : प्रतिनिधी 

जनसंघाचे संस्थापक तसेच अंत्योदय योजनेचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोविड - १९ काळात केलेल्या कार्याच्या ई-माहिती पुस्तकाचे प्रकाशन भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आज (दि.२५) रोजी इंदापूर येथे करण्यात आले.
यावेळी जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
या ई-पुस्तकाबाबत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, कोविड-१९ च्या काळामध्ये इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, स्वयंसेवक यांनी केलेल्या कार्याचे, सेवेचे, संघटनाचे तसेच शासनाला जागृत करण्यासाठी जी आंदोलन केली.गेली ती सर्व माहिती या ई - माहिती पुस्तिकामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद, भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्ह्याचे सचिव तानाजी थोरात, भाजपा किसान मोर्चा पश्चिम महाराष्ट्राचे संघटक माऊली चवरे, नगरसेवक कैलास कदम, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष राम आसबे,अमोल इंगळे,पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके  उपस्थित होते.
   
===============================

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापुर तालुका के 120 होम्योपैथिक डॉक्टर 16 जुलाई से मुंबई में होने वाले विरोध प्रदर्शन में भाग लेंगे।

राजकारणातील राजहंस दत्तात्रय मामा भरणे

डॉ. संदेश शाह को डॉ. सैमुअल हैनिमैन लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया गया।