पुणे : दौंड तालुक्यातील गावांमध्ये गरीब महिलांचे अनेक बचतगट कार्यरत असून त्या माध्यमातून महिला कामधंदा करत घरखर्चासाठी आर्थिक मदतीची तरतूद करत असतात. 
अशातच काही खाजगी व सरकारी बँका त्यांना कर्ज देतात. सदर कर्जफेड या महिला आपापल्यापरीने करत असतात. तालुक्यातील अशाच महिला बचत गटांनी काही खाजगी व सरकारी बँकांकडून कर्ज घेतले असून त्याचा हप्ता या महिला फेडतही आल्या आहेत. परंतु, सध्याच्या कोरोनाच्या जागतिक महामारीच्या संकटामुळे अनेक उद्योगधंदे बंद झाल्याने कष्टकरी महिलांचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे सद्यपरिस्थितीत गरीब महिला बँकांचे कर्ज वा हप्ते फेडण्यास असमर्थ आहेत. याबाबतीत महिलांनी बँकांना अनेकदा विनवणी करूनही त्यांचे वसुली अधिकारी सदर महिलांच्या घरी जाऊन बसत आहेत व कर्जवसुलीसाठी दमदाटी करत आहेत. हप्ते फेडा अन्यथा घरजप्ती आणू, पोलीस केस करू, तुमचे नांव काळ्या यादीत टाकू अशा धमक्या देत आहेत. त्यामुळे सदर महिला सध्या मानसिक दडपणाखाली वावरत असून त्यांना आपल्याच घरात असुरक्षित वाटू लागले आहे. त्यामुळे सदर महिलांनी अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीपुढे आपले गाऱ्हाणे मांडले. गरीब महिलांची सद्यपरिस्थिती जाणून घेत अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समिती चे संस्थापक अध्यक्ष मा.लालासाहेब गायकवाड यांच्या शी चर्चा करून गायकवाड यांच्या सुचणे नुसार  पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी पुढाकार घेत सदर महिलांना न्याय मिळवून देण्याकरिता व शासन दरबारी त्यांचे म्हणणे पोहोचविण्यासाठी बुधवार दि. 30 सप्टेंबर रोजी दौंडच्या तहसीलदार व नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मिलिंद शेंडगे, पुणे जिल्हाध्यक्ष राहुल झेंडे, दौंड तालुकाध्यक्ष विलास खरात, उपाध्यक्ष दादा साळवे व समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापुर तालुका के 120 होम्योपैथिक डॉक्टर 16 जुलाई से मुंबई में होने वाले विरोध प्रदर्शन में भाग लेंगे।

राजकारणातील राजहंस दत्तात्रय मामा भरणे

डॉ. संदेश शाह को डॉ. सैमुअल हैनिमैन लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया गया।