निमगांव-केतकी येथील आयोजित साऊंड, लाईट, मंडप, जनरेटर व्यवसायिकांच्या स्नेह मेळाव्यात इशारा.
इंदापूर : प्रतिनिधी
कोविड -१९ मुळे आमचा मंडप,साऊंड व्यवसाय हा अनेक महिन्यांपासून बंद असून आमच्यावर व संबंधित कामगार यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी शासनाने या व्यवसायाबाबत योग्य तो निर्णय व अटी घालून आम्हाला व्यवसाय करण्यास त्वरीत परवानगी द्यावी. शासनाने याबाबत वेळीच निर्णय न घेतल्यास येत्या काळात मातोश्रीवर आंदोलन करणार असल्याचा इशारा साऊंड, लाईट,मंडप,जनरेटर व डेकोरेशन संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश काळभोर यांनी निमगांव-केतकी (ता. इंदापूर) येथे दि. ३० सप्टेंबर रोजी व्यवसायिकांच्या स्नेह मेळाव्यात दिला.
पुणे जिल्हाध्यक्ष गणेश काळभोर पुढे म्हणाले की, आम्ही साऊंड, मंडप, लाईट, डेकोरेशन, जनरेटरचा व्यवसाय हा बँकाचे कर्ज घेवून सुरु केला आहे. परंतु कोरोनामुळे आमचा व्यवसाय हा पूर्ण ठप्प असून आमच्या कुटुंबावर व या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.आमच्याकडे बँकाचे, पतसंस्थाचे कर्ज भरण्यास पैसे नाहीत. व्यवसाय बंद असताना आम्ही घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याकरिता बँका आमच्या पाठीमागे तगादा लावत आहेत.अश्या परिस्थितीत आम्ही आमचे कुटुंब चालवायचे? आमच्या कामगारांचे कुटुंब चालवणार कसे? की बँकाचे हप्ते भरायचे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पुणे जिल्हाध्यक्ष काळभोर म्हणाले की, शासनाने लग्न कार्यात ५० लोकांना परवानगी दिली आहे. लग्न शुभकार्यात समारंभ पार पाडण्या करिता आमचे केवळ तीनच लोक यामध्ये सहभागी होतात. तरी शासनाने आम्हाला पूर्वीप्रमाणेच व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. हा निर्णय शासनाने वेळीच न घेतल्यास संबंध महाराष्ट्र राज्यातील साऊंड व्यवसायिकांच्या गाड्यांसह मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
महाराष्ट्र राज्य साऊंड असोसिएशन अध्यक्ष निकेश मोरे उपाध्यक्ष अनिल पाटील खजिनदार निरंजन आव्हाळे कार्याध्यक्ष गोरख माने
महाराष्ट्र राज्य साऊंड लाईट अॅण्ड जनरेटर असोसिएशनचे सल्लागार पिंटूशेठ देवकर, सल्लागार योगेश बाबा कामठेअध्यक्ष निकेश मोरे,उपाध्यक्ष अनिल पाटील, संघटक गुड्डू भांबुरे
पुणे जिल्हा साऊंड असोसिएशन अध्यक्ष गणेश काळभोर
अमोल आमले,दिलीप नागरगोजे,जयवंत माळी,धनाजी सरगर,दादासाहेब तरंगे,दादा पठाण, सागर कासार,योगेश गायकवाड.उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा