इंदापूर : प्रतिनिधी 
इंदापूर शहर काँग्रेसच्या पक्षाच्या वतीने  कोरोना काळातील संकटात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अनेक मागण्या जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी कार्यालय,नगरपरिषद, यांच्याकडे करण्यात आल्या होत्या.त्यातील काही मागण्या व सुचनांना बर्‍यापैकी यश आल्याची माहिती शहराध्यक्ष तानाजीराव भोंग यांनी दिली.

 ते पुढे म्हणाले, इंदापूर शहरातील नागरिकांसाठी कोरोना संकटात उपाययोजना संदर्भातील मागणी, इंदापूर शहरातील सर्व नागरिकांची आरोग्याची तपासणी,जनता कर्फ्यू काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई, इंदापूर येथील कोविड सेंटरमध्ये जनरेटरची सुविधा पुरविणे अश्या प्रकारच्या मागण्या व त्यासंबंधी सूचना आम्ही वारंवार संबंधित कार्यालयाकडे केल्या होत्या.यातील आमच्या काही मागण्या पूर्ण झाल्या आहेत.अजून काही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत  त्याबद्दल आवाज उठवणार असल्याचे श्री.भोंग यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, यापुढे शहर बंदला आमच्या पक्षाचा विरोध असेल.बंद हा पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या संदर्भात ज्याकाही उपाययोजना करावयाच्या आहेत.त्या जनता कर्फ्यूच्या बंदमध्येच करुन अमलात आणाव्यात व तसेच पुढे चालू ठेवाव्यात असे काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजीराव भोंग यांनी सांगितले.

===============================

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापुर तालुका के 120 होम्योपैथिक डॉक्टर 16 जुलाई से मुंबई में होने वाले विरोध प्रदर्शन में भाग लेंगे।

राजकारणातील राजहंस दत्तात्रय मामा भरणे

डॉ. संदेश शाह को डॉ. सैमुअल हैनिमैन लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया गया।