कोराणामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबांना विमा कवचची रक्कम त्वरीत द्या:-इंदापुर तालुका पत्रकार संघ
इंदापूर: सध्या महाराष्ट्रात कोरोना ला हद्दपार करण्यासाठी अनेकांनी कंबर कसली आसून, त्यावर लस उपलब्ध झाली आसली तरी प्रत्येक व्यक्तीला त्वरित मिळेल याची खात्री नाही,या आजारा पासून स्वतःला वाचवण्यासाठी सदैव जागरूकता रहावे, पण ऑन ग्राउंड काम करणारे पोलिस, पत्रकार, इतर अनेक जनांना याची लागण झाली आहे, आणि कोराणामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबांना विमा कवचची रक्कम मिळणेबाबत चे निवेदन देणार इंदापूर तालुक्यातील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद चे पुणे जिल्हा अध्यक्ष डाॅ.संदेश शहा, जेष्ठ पत्रकार शैलेश काटे, काकासाहेब मांढरे दै.जनप्रवास , सुरेश जकाते शहराध्यक्ष , विलासराव गाढवे संपादक लक्ष्मी वैभव न्युज, धनंजय कळमकर संपादक शिवसृष्टी न्युज , दिपक खिलारे ग्रामीण महाराष्ट्र न्युज ,विजयराव शिंदे इंदापुर लाईव्ह, शिवाजीराव पवार शिवलिला चे मालक व जनप्रवास ,सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार
यांनी तहसीलदार यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिले, कोराणा काळात
डॉक्टर पोलीसच नाही तर पत्रकारही आपल्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत या काळात
अनेक पत्रकारांचा यामध्ये कोरोणामुळे मृत्यू झालेले आहेत,यामध्येटीव्ही 9 वृत्तवाहिनीचे पुण्यातील
प्रतिनिधी पांडुरंग रायकर व रायगड जिल्हातील माथेरान कर्जत येथील पत्रकार संतोष पवार यांचा
समावेश असून त्यांच्या पाठीमागे त्यांच्यावर अवलंबून असणारा परिवार आहे
तरी शासनाने जाहिर केलेले ५० लाखांचं विमा कवच ची रक्कम त्यांच्या कुठुबींयाना त्वरीत देण्यात यावी .
कर्तव्य बजावत असताना कोरोनाची
लागण झाली. तसंच यात दुर्देवानं त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबियांना या विम्याचा लाभ मिळेल
असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे तसंच कोरोनाचं काम करणा-या कोणत्याही व्यक्तीला
कोरोनाची बाधा झाली आणि त्याच्यावर हा प्रसंग ओढावला तर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिल्यावर
त्यांना ५० लाखांचं हे विमा कवच मिळणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलेले आहे तरी. त्यांच्या कुटुंबियांना
विमा कवच चे पन्नास लाख रुपये महाराष्ट्र शासनाने त्वरित मदत दयावी या साठी आज तहसीलदार सोनाली मेटकरी यांना फोन वरून माहिती दिली होती, तेच निवेदन त्यांच्या कार्यालयात देण्यात आले,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा