इंदापूर : प्रतिनिधी
कर्तव्य पार पाडताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबळींवर अंत्यसंस्कार करणा-या नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचा-यांचा दि.११ सप्टेंबर रोजी भरत शहा मित्रपरिवार व महात्मा फुले ग्रुपच्या वतीने सन्मान करण्यात आला. येथील स्मशानभूमीच्या परिसरात हा कार्यक्रम पार पडला.
इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल,आरोग्य निरीक्षक मनोज बारटक्के व आरोग्य विभागातील कर्मचारी हे सन्मानाचे मानकरी होते. यावेळी त्यांना कोविड योद्धा सन्मानपत्र,गुलाब पुष्प व वाफेचे मशीन देऊन सन्मानित करण्यात आले.
सन्मानमुर्तींच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारापासून संपूर्ण रस्त्यावर फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होता.पुष्पवर्षावात त्यांचे स्वागत करण्यात आले.
इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष भरत शहा,म.फुले ग्रुपचे अध्यक्ष,नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते पोपट शिंदे,जावेद शेख,सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे,पत्रकार डॉ.संदेश शहा,पत्रकार सुरेश जकाते,ॲड.विलास बाब्रस, मयूर गुजर, बोरा, गजानन पुंडे, अल्ताप पठाण, अशोक चिंचकर, अंबादास नाळे, धनाजी भोंग यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शिंदे यांनी केले. गजानन पुंडे यांनी आभार मानले.
====================================
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा