इंदापुर:प्रतिनिधी //
इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू लागू केला आहे.या जनता कर्फ्यूमधे तालुक्यातील नागरिकही स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहेत. परंतु तालुक्यात खासगी फायनान्स चे अधिकारी घरोघरी जावून वसूली करत असल्याचे असल्याने कोरोना वाढीचा धोका निर्माण होत आहे.ही सुरु असलेली वसुली थांबवावी अशी मागणी इंदापूर युवक काँग्रेसचे सरचिटणीस अरुण राऊत यांनी पत्राद्वारे तहसिलदार यांना केली आहे.
पत्रातील विषयान्वये सविस्तर माहिती अशी की, इंदापूर तालुक्यामध्ये कार्यरत असलेले खाजगी फायनान्स, बचत गट फायनान्सचे वसुली अधिकारी हे एका दिवसामध्ये १० ते १५ गावामध्ये वसुलीकरिता जात आहेत.तसेच काही बचत गट
फायनान्स चे वसुली अधिकारी हे इतर जिल्हयाबाहेरील असल्यामुळे त्यांच्या मार्फत सुद्धा कोरोना पसरण्याचा धोका निर्माण झालेला असलेमुळे सदरील खाजगी
फायनान्स, बचत गट फायनान्स चे वसुली अधिकारी यांना गावोगावी फिरण्यास बंदी करणेत यावी.अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे.
ही मागणी पूर्ण न झाल्यास इंदापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष स्वप्निल सावंत,इंदापूर तालुका शहर अध्यक्ष तानाजी भोंग, उपाध्यक्ष बिभीषण लोखंडे व युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्याचा इशारा सरचिटणीस अरुण राऊत यांनी दिला आहे.
==============================
सदर आंदोलन करणे चुकीचे आहे कारण जो RBI ने मोरेटोरियम चा कालावधी दिला होता तो पूर्ण झाला आहे, त्या मुळे सर्व बँका आपले हप्ते परत फेडी साठी कस्टमर कडे विनंती करणारच आहे, नाही भरले तर वसुली अधिकारी त्यांच्या घरो घरी जाणार आहेतच पण ते केव्हा जेव्हा त्यांनी वेळेत हप्ते नाही भरले तर, ते घरी जाण्या पूर्वी किमान 8-9 फोन कॉल सदर कस्टमर ला करतात• कस्टमरला विनंती करतात की तुम्ही घरा बाहेर पडू नका जो हप्ता भरणे पेंडींग आहे तो तुम्ही ऑनलाईन पण भरू शकता आणि राहिला अधिकारी घरी जायचा विषय तर सदर अधिकाऱ्याला पण परिवार आहे का त्याला नाही का कोरोनाची भीती, की कोरोना त्याला नाही होणार, तो तेवढीच एव्हाना त्या पेक्षा ज्यास्त काळजी घेतो , स्वतः मास्क वापरतो तसेच समोरील कस्टमरला विनंती करतो की मास्क घाला, सोसियल डीस्टन्स ठेवतो, सतत सेनेटायजरचा वापर करतो, एवढं सर्व तो करतो तरी पण त्याच्या विरोधात आंदोलन कारण कुठवर योग्य आहे, तुम्ही लोकांना विनंती करा आपण घेतलेल्या कर्जाची फेड वेळेत करा किंवा RBI ला सांगा आजून एक वर्ष हप्ते पुढे ढकलायला त्यांनी ऐकलं तर अधिकारी आपोआप स्वतःच्या घरी थांबतील, असे पण ते सहा महिने बिना पगाराचे घरीच होते आजून पुढील सहा महिने राहतील घरी जगले तर ........
उत्तर द्याहटवा