इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील मौजे नरुटवाडी येथे विजेची तार तुटून लागलेल्या आगीत शेतात उभा असलेला ऊस जळाल्याने शेतकर्याचे अतोनात नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, मौजे नरुटवाडी येथील शेतकरी भीमाशंकर विलास जाधव यांच्या शेतात दि.१४ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता विजेची तार तुटून लागलेल्या आगीत शेतात उभा असलेला अंदाजे सव्वा एकर ऊस जळाला आहे.यामध्ये त्यांचे नुकसान झाले आहे.
सदर घटनेचा पंचनामा महावितरणचे इंजिनिअर श्री.डवस, वायरमन श्री. चोपडे, तसेच तलाठी सचिन करगळ, कृषी विभागाचे प्रशांत मोरे यांनी केला आहे.
या पंचनाम्यामध्ये अंदाजे ८० टन ऊस जळीत झाला असल्याचे नमूद केले आहे. सदर शेतकऱ्याचे अंदाजे एक लाख पंच्चाहत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.असे नमूद केले आहे,
शेतकरी भीमाशंकर जाधव म्हणाले की, सध्या कोणतेही साखर कारखाने चालू नसल्याने ऊस कुठेच पाठवता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरीत द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
====================================
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा