इंदापूर : प्रतिनिधी
एखाद्या सामाजिक, राजकीय संघटनेच्या,पक्षाच्या वतीने नेमणूक,निवड झाल्यानंतर हार-तुरे फेटा, फटाके, पार्टी, सत्कार या प्रकारांना फाटा देत.
अखिल भारतीय गरीबी निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आज दि.१७ रोजी इंदापूर शहरामध्ये मास्कचे वाटप करुन निवडीचे स्वागत केले.
या समितीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी दैनिक जनप्रवास वृत्तपत्राचे इंदापूर तालुका प्रतिनिधी काकासाहेब मांढरे यांची पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी व साप्ताहिक शिवसृष्टीचे संपादक तसेच शिवसृष्टी वेब न्यूज पोर्टल युट्यूब चॅनेलचे संपादक धनंजय कळमकर यांची पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
या निवडीचे पत्र समितीचे संस्थापक -अध्यक्ष लालासाहेब गायकवाड, सल्लागार अॅड. एस.ए.येवते -पाटील,सिनिअर अॅडव्होकेट नवी दिल्ली,यांनी दिले आहे.
या निवडीनंतर या दोन पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसमवेत सामाजिक बांधिलकी जपत जनता कर्फ्यूच्या काळात शहरामध्ये विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना,प्रवाश्यांना मास्कचे वाटप करुन निवडीचे आगळे-वेगळे स्वागत केले.यावेळी मास्क वापरण्याचे फायदे नागरिकांना सांगण्यात आले.तसेच कोरोना काळातील शासनाच्या नियमांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाला इंदापूर अर्बन बँकेचे संचालक दादासाहेब पिसे, ह.भ.प.प्रदीप (आण्णा) पवार, वंचित बहुजन आघाडी चे इंदापूर शहराध्यक्ष हणमंतराव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार,कवी माऊली नाचण,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे शहराध्यक्ष पत्रकार सुरेश जकाते,
दैनिक लोकमत चे इंदापूर प्रतिनिधी सागर शिंदे, दैनिक स्वाभिमानी छावा तसेच हिंदवी स्वराज्य न्यूज पोर्टल चे इंदापूर तालुका प्रतिनिधी कैलास पवार,आधार न्युजचे इंदापूर तालुका प्रतिनिधी जितेंद्र जाधव, ग्रामीण महाराष्ट्र न्युज वेब पोर्टलचे इंदापूर प्रतिनिधी दिपक खिलारे यावेळी उपस्थित होते.
====================================
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा