जनता कर्फ्यू च्या काळात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून कोरोना बाधितांची चौकशी.
इंदापूर : प्रतिनिधी 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंदापूर तालुक्यात १२ सप्टेंबर ते २० सप्टेंबर पर्यंत आठ दिवसाचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकाराने जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला इंदापूर तालुक्यातील व शहरातील जनतेने शंभर टक्के प्रतिसाद दिला.
 
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यातील प्रत्येक गावाला भेटी दिल्या.त्यांच्यासोबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद होते. राज्यमंत्री भरणे व कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबांना भेटी दिल्या. संपूर्ण शहरातून दोघांनी पदयात्रा करत नागरिकांशी संवाद साधला.

 राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, प्रत्येक नागरिकाने योग्य ती काळजी घेतली पाहिजे. तोंडाला मास्क लावला पाहिजे. गर्दीत जाणे टाळले पाहिजे. प्रत्येक कुटुंबातील वयोवृद्ध लहान मुलांची योग्य  काळजी व खबरदारी घेतली पाहिजे. इंदापूर तालुक्‍यात आज पर्यंत १४५० रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत त्या सर्वांवर उपचार सुरु आहे. सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाचे संकट परतून लावण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन भरणे यांनी केले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगातून ४६० कोटी तर १५ व्या वित्त आयोगातून १३२ कोटी रुपयांचा निधी ग्रामपंचायतीला पाठवलेला होता यातील ठराविक रक्कम आरोग्यावर खर्च करावी लागते. जिल्ह्यातील ९६ प्राथमिक आरोग्य केंद्र पैकी ९२आरोग्य केंद्र राहिले रुग्णवाहिका खरेदी करण्याची तयारी यातील ६७ ग्रामपंचायतीने रुग्णवाहिका खरेदी केली. मात्र उर्वरित ग्रामपंचायतींनी व प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्ण कल्याण समितीने अंतर्गत निधी जमा करून रुग्णवाहिका घेण्यासाठी पुढे यावे याचा फायदा आपल्या गावातील लहान बालके महिला अबालवृद्ध व इतर रुग्णांसाठी नागरिकांसाठी होणार आहे. असे आवाहन आयुष प्रसाद यांनी केले.
यावेळी नगराध्यक्ष अंकिता शहा,तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, मुख्याधिकारी डॉक्टर प्रदीप ठेंगल, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एकनाथ चंदनशिवे, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, नगरसेवक अमर गाडे, नगरसेवक पोपट  शिंदे, अशोक मखरे, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष राहुल गुंडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

===============================

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापुर तालुका के 120 होम्योपैथिक डॉक्टर 16 जुलाई से मुंबई में होने वाले विरोध प्रदर्शन में भाग लेंगे।

राजकारणातील राजहंस दत्तात्रय मामा भरणे

डॉ. संदेश शाह को डॉ. सैमुअल हैनिमैन लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया गया।