इंदापूर : प्रतिनिधी
श्रमिक पत्रकार संघाची इंदापूर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णकांत कोबल यांच्या सुचनेनुसार इंदापूर तालुक्यातील सभासद नोंदणी व अध्यक्ष निवडीची बैठक लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील भवानी गड (भवानी माता मंदिरा ) च्या आवारात आज दि. २७ रोजी घेण्यात आली.
यावेळी सभासद नोंदणी करुन अध्यक्ष पदाची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष पदासाठी एकमेव सुरेश श्रीहरी मिसाळ यांचे नाव सर्वानुमते पुढे आल्याने मिसाळ यांची इंदापूर तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष निवडी नंतर अध्यक्ष तसेच उपस्थित सर्व सदस्याच्या एकमताने तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये तालुका उपाध्यक्षपदी तात्यासाहेब घाटे, कार्याध्यक्षपदी देवा राखुंडे, सचिवपदी सत्यजीत रणवरे, संघटकपदी शिवाजी पवार व प्रसिद्धी प्रमुखपदी विजय शिंदे यांची निवड करण्यात आली.
अध्यक्षांसह, कार्यकारिणी मध्ये निवड झालेल्या सदस्याचा या वेळी सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जेष्ठ पत्रकार डॉ.विकास शहा,संतोष दहिदुले,विश्व वारकरी सेना भारत पुणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब उगलमोगले,इम्तिहाज मुलाणी, प्रतापसिंग रजपुत, कैलास पवार,सचिन खुरंगे आदि पत्रकार बांधव उपस्थित होते.
-------------------------------------------------------
===============================
साप्ताहिक यशवंत टाईम्स ऑनलाइन वेब न्युज पोर्टल तर्फे नवनियुक्त पदाधिकारी यांची स्वागत
उत्तर द्याहटवा