इंदापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी शहरात साठेनगर भागात उभारण्यात आलेल्या लोकशाहिर अण्णा भाऊ साठे ग्रंथालयास आज ( दि.१५ सप्टेंबर ) रोजी भेट दिली.
जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या लोकशाहिर अण्णा भाऊ साठे ग्रंथालयास भेट दिली.यावेळी त्यांनी येथील सुविधेची माहिती घेतली व आवश्यक त्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी ग्रंथालय समितीचे अध्यक्ष उमेश ढावरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान दोन दिवसापूर्वी या परिसरामध्ये बसविण्यात आलेल्या वाफ घेण्याच्या यंत्रणेची त्यांनी यावेळी पाहणी केली.कोरोनापासून बचाव करण्यासाठी हाही एक उपाय असल्याचे सांगून स्वतः त्याचा वापर केला.तसेच येथील नागरिकांनीही सकाळ व संध्याकाळ या दोन वेळेत याचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे, नगरसेविका राजश्री मखरे, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, प्रा.अशोक मखरे, माजी नगरसेवक विनोद बाब्रस, शहराध्यक्ष अनिल राऊत, माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले, माजी नगरसेवक हरिदास हराळे, अमोल उन्हाळे, अॅड. विलास बाब्रस, अनिल ढावरे, दिलीप शिंदे, ललेंद्र शिंदे, बाळासाहेब मखरे, मयुर ढावरे, उमेश ढावरे, नंदू खंडाळे, बाळासाहेब आडसुळ, चंद्रकांत सोनवणे, राजु गुळीक, अनिल गोरे, विशाल ढावरे व सर्व समिती सदस्य उपस्थित होते.
------------------------------------------------------------
====================================
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा