इंदापूर :-(प्रतिनिधी-दि.११/९/२०२०)  ५ सप्टेंबर २०२० रोजी म्हणजेच शिक्षकदिनी इंदापूर तहसील कचेरी समोर विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलनास बसलेल्या आश्रमशाळेच्या आंदोलनकर्त्यांना आंदोलनस्थळी  इंदापूरच्या पत्रकारांच्या शिष्टमंडळाने आज दि.११/९/२० रोजी दुपारी सदिच्छा भेट दिली.भेटीदरम्यान आंदोलनकर्ते  मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूरचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समवेत आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे गत वर्षीचे   अनुदाना संदर्भातील माहिती व कर्मचाऱ्यांच्या अडचणी, प्रश्न  शिष्टमंडळाने जाणून घेतले. शिष्टमंडळाने आंदोलनकर्त्यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. पत्रकारांच्या शिष्टमंडळात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दै.सकाळचे बातमीदार  डॉ. संदेश शहा , शहराध्यक्ष सुरेश जकाते, वेब न्यूज पोर्टलचे अध्यक्ष शैलेश काटे, जन प्रवासचे पत्रकार काकासाहेब मांढरे, शिवसृष्टी न्युजचे धनंजय कळमकर , ग्रामीण न्युजचे  दीपक खिलारे व इंदापूरचे सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार ह्या सर्वांनी आंदोलनस्थळी भेट देऊन समस्यांबाबत चर्चा केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारणातील राजहंस दत्तात्रय मामा भरणे

डॉ. संदेश शाह को डॉ. सैमुअल हैनिमैन लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया गया।