इंदापूर : प्रतिनिधी 
इंदापूर तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण हे दिवसेंदिवस वाढतच चालले असून दुसरीकडे कोरोना रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे.तालुक्यातील मृत्यूचे प्रमाण हे केवळ पुणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.हा मृत्यूदर कमी करण्याबाबत लोकप्रतिनिधी कडून कोणत्याही उपाययोजना न करता फक्त आश्वासनेच दिली जात असल्याने जनतेचे जीवन हे रामभरोसे असल्याची टिका भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड.शरद जामदार यांनी केली.

अॅड.जामदार म्हणाले की, लोकप्रतिनिधींनी कोरोना संकट काळात इंदापूर तालुक्यातील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे.कोविड रुग्णांसाठी अत्याधुनिक सोई-सुविधा असणारे बेड निर्माण केले असल्याचा नुसता भपका केला जात आहे. जनतेला फक्त आश्वासना वर आश्वासने देण्याचे काम तालुक्याचे लोकप्रतिनिधी करत असल्याची टिका त्यांनी यावेळी केली.

 ते पुढे म्हणाले, शेजारील बारामती, दौंड तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शंभर-शंभर अत्याधुनिक बेडची सुविधा असणारे कोविड उपचार केंद्र उभी राहिली आहेत. शेजारील अकलूज याठिकाणीही ७५ अत्याधुनिक बेड असणारे कोविड उपचार केंद्र उभारण्यात आली आहेत. 

परंतु इंदापूर तालुक्यातील भिगवण,निमगाव केतकी व इंदापूर येथे असणाऱ्या कोविड उपचार केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय असून ही बाब बेजबाबदार, निष्क्रियता दर्शवित असल्याची टिका त्यांनी यावेळी केली.

 अॅड.जामदार म्हणाले की,मंत्रिपद हे केवळ भुषवण्याकरता, मिरवण्याकरिता नसुन ज्या जनतेने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेल्या जनतेच्या सेवेसाठी असते.कोविड रुग्णांकरिता शेजारील तालुक्यात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सोयीसुविधेंचा थोडाफार आदर्श लोकप्रतिनिधींनी घ्यावा अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.

लोकप्रतिनिधी जर बेजबाबदारपणे वागत असतील तर कोणत्याही परिस्थितीत ते खपवून घेतले जाणार नाही.जनतेच्या आरोग्यासाठी,हक्कासाठी आम्ही स्वतः रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचा इशारा अॅड. शरद जामदार यांनी दिला. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापुर तालुका के 120 होम्योपैथिक डॉक्टर 16 जुलाई से मुंबई में होने वाले विरोध प्रदर्शन में भाग लेंगे।

राजकारणातील राजहंस दत्तात्रय मामा भरणे

डॉ. संदेश शाह को डॉ. सैमुअल हैनिमैन लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया गया।