प्रवाशांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करुन. हमीदभाई आतार यांचा इंदापूरमध्ये अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा.
इंदापूर : प्रतिनिधी
गेली अनेक महिने कोरोनाने आपल्या देशात थैमान घातले आहे.या महाभयंकर व्हायरसमुळे इंदापूर शहर व तालुक्यातही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहेत.अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. शासनाने नागरिकांना दैनंदिन जीवन जगताना सुरक्षित अंतर पाळणे, मास्कचा वापर,सॅनिटायझरचा वापर असे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.परंतु या नियमांचे नागरिकांकडून पालन होत नसल्याचे दिसत आहे.यामुळे नागरिकांना याचे गंभीर परिणाम जाणवत आहे.
हि बाब लक्षात घेवून इंदापूर शहरातील रहिवाशी असलेले सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार यांचा वाढदिवस हा आज दि.९ रोजी होता.त्यांनी हा वाढदिवस हारतुरे,केक न कापता इंदापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इंदापूर एस.टी.बसस्थानकामध्ये प्रवासाकरिता येणार्या - जाणाऱ्या प्रवाशांना मास्क व सॅनिटायचे वाटप करुन आगळ्या - वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
यादरम्यान इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंदशेठ शहा यांच्या हस्ते इतर ठिकाणाहून येणा-या अनेक प्रवाशांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरचे प्राथमिक स्वरुपात वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना मुकुंद शहा यांनी सांगितले की,लहान मुलांची व जेष्ठ नागरिक यांची रोग प्रतिकारक क्षमता कमी असते.त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.
कोणी बिगर मास्कचा दिसले की,त्यांना आम्ही मास्कचे वाटप केले मास्क का वापरावे, हे समजून सांगण्यात आले.
अनेकजण विनामास्क फिरतात.त्यांना या रोगाचे दुष्परिणाम माहीत नाही.त्यामुळे आम्ही मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार यांनी सांगितले.
वाढदिवसाला हार,फेटा, केक,फटाके व नाहक गर्दी, इतर अनावश्यक खर्च हमीदभाई आतार यांनी टाळून इंदापुर येथील बसस्थानक परिसरात येणा-या व जाणा-या प्रवाशांना सॅनेटायझर आणि मास्क वाटप करुन सामाजिक संदेश दिला आहे. वाढदिवसासाठी होणा-या वायफळ इतर खर्च टाळून त्यांनी हे मास्क आणि सॅनेटायझर देण्याचे ठरविले.यांच्या या निर्णयामुळे वाढदिवसादिनी त्यांनी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
या वेळी विचारमंथन परिवाराचे ग्रुप अॅडमीन व सर्वांचे जवळचे मित्र प्रकाशराव पवार, वंचित बहुजन आघाडी चे इंदापूर शहराध्यक्ष हणुमंत कांबळे,कवी माऊली नाचण, शिवसृष्टी न्यूजचे संपादक धनंजय कळमकर,पत्रकार काकासाहेब मांढरे, पत्रकार कैलास पवार,जितेंद्र जाधव,इम्तियाज मुलाणी इतर अनेक कार्यकर्ते यांच्या उपस्थित हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार सोशल डिस्टन्शिंग पाळून, सॅनिटायझर व मास्कचा वापर करुन पार पडला.
या कार्यक्रमाचे आभार कवी माऊली नाचण यांनी मानले.
===============================
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा