जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या हस्ते बावडा येथील आरोग्य उपकेंद्रात वैद्यकिय साधनांचे वाटप
इंदापूर :प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज असून डॉक्टर व आरोग्य विभागाचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न या रुग्णांवर उपचार करत आहेत.त्यांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे याकरिता पुणे जिल्हा परिषदेच्या कोविड कॅश कार्ड अंतर्गत तीन लाख रुपये रकमेचे पी.पी. ई किट,मास्क,ऑक्सिमीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर व इतर साहित्याचे वाटप पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील यांच्या हस्ते दि. १० रोजी बावडा (ता. इंदापूर) येथील बावडा आरोग्य उपकेंद्र येथे करण्यात आले.
याकार्यक्रमादरम्यान बोलताना जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी म्हणाल्या की,इंदापूर तालुक्यामध्ये सध्या कोरोनाची भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.सामुहिक संपर्काच्या माध्यमातून अनेक जण कोरोनाबाधित होत आहेत.या कोरोनाबाधित रुग्णांना किंवा संशयित रुग्णांवर डॉक्टर व आरोग्य कर्मचारी हे आपल्या जीवाची पर्वा न करता आपली सेवा बजावत आहेत.त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुणे जिल्हा परिषदेच्या कोविड कॅश कार्ड अंतर्गत तीन लाख रुपये रकमेचे पी.पी. ई किट,मास्क,ऑक्सिमीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर व इतर साहित्याचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बावडा गावचे सरपंच किरण पाटील, बावडा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अधिकारी डॉ.कपिलकुमार वाघमारे,डॉ.स्नेहल पवार,डॉ.पाणबुडे,डॉ.निकिता घोगरे, डॉ.वैशाली खाडे,डॉ.सुमती ढोले व इतर आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
===============================
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा