वाढिव वीजबीलांची हाेळी, भाजपाचे इंदापुर महावितरण कार्यालया समाेर आंदाेलन..., माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सह शेकडाे कार्यकर्ते आंदाेलनात सहभागी
इंदापुर दिनांक 19/ 11 /20 भारतीय जनता पार्टिचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे प्रमुख उपस्थीती मध्ये आज दि. 19 /11 /20.राेजी  ग्राहकांच्या वीजबील संदर्भात वीजबीलांची हाेळी करत इंदापुर महावितरण कार्यालया समाेर आंदाेलन करणेत आले , यावेळी महाविकास आघाडि सरकारचा निषेध असाे , " काेण म्हणत देत नाहि घेतल्या शिवाय राहत नाहि " अशा प्रकारच्या घाेषणा देणेत आल्या . महाराष्ट्रराज्याचे उर्जामंत्री व राज्यसरकारचा जाहिर निषेध व्यक्त करणेत आला , 
यावेळी बाेलताना भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारने काेराेना काळात वीजबील ग्राहकांचे बील माफ करू , ग्राहकांच्या वीजबील युनीट मध्ये सवलत देऊ , वाढिव बीले देणार नाही, जळालेले विद्युत राेहित्र हे ताबाेडताेप बसुन देऊ अशा घाेषणा महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी केल्या हाेत्या , परंतु काल अचानकपणे राज्याचे उर्जामंत्री राऊत यांनी राज्यसरकारची आर्थिक परीस्थीत नाहि असे सांगीतले , त्यांना यापरीस्थीतीचा अंदाज नव्हता का ? 
असा प्रश्न उपस्थीत करत महाविकास आघाडी सरकारने शेतकरी व ग्राहकांची फसवणुक केली असल्याचा गंभीर आराेप पाटील यांनी यावेळी केला .  
तसेच काेवीड काळात महाराष्ट्रात सर्व आर्थिक व्यवहार ठप्प असले कारणाने सरकारने महाराष्ट्रातील सर्वांची हाेणारी सक्तीची वीजबीलं वसुली थांबवावी व वीजबील माफ करावे अशी मागणी करत याबाबतचे निवेदन महावितरणचे  अभियंता श्री . गाेफणे साहेब यांचे कडे देऊन वीजबील माफ न झालेस शेतकरी व वीजग्राहक यांना एकत्र करून भारतीय जनता पार्टिच्या वतीने तीव्र आंदाेलन छेडण्यात येईल असा ईशाराही यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिला . 
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष अँड . शरद जामदार , भाजपा शहराध्यक्ष शकिल सय्यद , निराभीमा कारखानेचे चेअरमन लालासाहेब पवार , व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे , विलासराव वाघमाेडे , मयुरसिंह पाटिल , मंगेशजी पाटिल , अँड क्रुष्णाजी यादव , प्रताप पाटिल , हर्षवर्धन कांबळे , पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्य,किसान माेर्चाचे प्रमुख माऊली काका चवरे , माजी शहराध्यक्ष माऊली वाघमाेडे , बाप्पु जामदार , बाळासाहेब पानसरे , माेहन गुळवे , लंलेद्र शिंदे , संताेष देवकर व इतर कार्यकर्ते उपस्थीत हाेते . 

टिप्पण्या