वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सविधान दिन उत्साहात साजरा -हणुमंत(तात्या)कांबळे


इंदापूर : २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापन झाली. मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती होते. हिचे काम संविधान निर्मिती करणे हे होते.


अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला. त्यामुळे भारतात २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.आसे मत वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर शहराध्यक्ष हणुमंतराव कांबळे यांनी व्यक्त केले,


      इंदापूर पोलिस स्टेशन ,गट विकास अधिकारी यांना सविधान प्रत भेट दिली,संविधानाचे वाचन,करून,सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले,या वेळी ,अॅङ बापू साबळे , दत्तात्रय घोडके , प्रमोद चव्हाण , हनुमंत बनसोडे, डॉ.सुदिप ओव्हाळ ,माऊली(दादा)नाचण हमीभाईअत्तार ,प्रकाशराव पवार ,हनुमंत(तात्या) कांबळे इ .अनेक कार्यकर्ते उपस्थित होते ,हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार सॅनिटायझर व मास्कचा चा वापर करून पार पडला.

टिप्पण्या