इंदापूर: दि. २६ नोव्हेंबर २०२० रोजी भारतीय संविधान दिन इंदापुर शहरामध्ये साजरा करण्यात आला असुन या संविधान दिनाचे औचित्य साधून विश्वरत्न प.पू. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ मार्च १९२७ साली स्थापित केलेले
राष्ट्रीय सामाजिक मातृसंघटन "समता सैनिक दल" या सामाजिक संघटनेच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय इंदापूर (डाॅ. आंबेडकरनगर) व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय (अण्णाभाऊ साठे नगर) या दोन्ही वाचनालयांना फुले, शाहु, आंबेडकरी विचारधारेच्या पुस्तकांच्या संच भेट देण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ मार्गदर्शक साथी सलिम शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून इंदापुर ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक मा. डाॅ. एकनाथ चंदनशिवे होते त्याच बरोबर कार्यक्रमाचे आयोजक व सतत सामाजिक कार्यक्रमात आग्रेसर आसणारे, समता सैनिक दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष आयु. अशोकराव पोळ, इंदापुर तालुका अध्यक्ष मेजर, तानाजी मोरे , तालुका संपर्क प्रमुख आयु. सतीश देठे, आर पी आयचे इंदापूर शहराध्यक्ष आयु. अमोल मिसाळ, आयु. सुनिल सोनवणे, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व संविधान प्रस्ताविकेचे वाचन सामाजिक कार्यकर्ते आयु. सतीशभाऊ सागर यांनी केले या कार्यक्रमाला अभी अवघडे, पोलिस काॅन्टेबल मा. तुषार ढावरे साहेब, अमित ढावरे, नागेश शिंदे असे अन्य सामाजिक बांधव व विद्यार्थी मित्र उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालय अधिक्षक आयु. नंदकुमार खंडाळे व आयु. उमेशभाऊ ढावरे यांनी परिश्रम घेतले..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा