इंदापूरः तालुक्यातील कांदलगाव येथील प्रवीण बाबर डॉ. सचिन बाबर आणि संबंधितावर 395 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात इंदापूर पोलिस स्टेशन समोर २०/१२/२०२० रोजी पासुन बेमुदत धरणे आंदोलन केले असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय भैया सोनवणे यांनी निवेदनाद्वारे दिली होती .
या वेळी बोलताना सोनवणे म्हणाले की,
कांदलगाव तालुका इंदापूर येथील येथील प्रवीण गणपत बाबर व कुटुंबातील व्यक्तीवर अन्यायग्रस्त पद्माकर बाबर यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावर कारवाई करण्यात यावी,डॉ. सचिन बाबर यांना तात्काळ अटक करावी डॉ. सचिन बाबर,यांनी सौ. सुमन बाबर, यांना अकलूज येथे हलवले त्या हॉस्पिटलची सखोल चौकशी करण्यात यावी, आईला औषध दिले म्हणून व आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून 306,307चा गुन्हा दाखल करण्यात यावा व आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा असून संबंधित सुमन बाबर यांच्यावरही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला 309 चा गुन्हा दाखल करण्यात यावा,कांदलगाव येथील सरपंच रविंद्र पाटील यांनी बेकायदेशीरपणे प्रवीण बाबर यांना जमीन तुमचीच आहे, असा महसूल विभागाचा अधिकार नसताना दाखला देऊन बाबर विरुद्ध बाबर असा वाद वाढवल्यास जबाबदार धरून फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी सरपंच पद रद्द करण्यात यावे,
यासाठी इंदापूर पोलिस स्टेशन समोरे उपोषण केले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा