इंदापूरः तालुक्यातील भरणे वाडी येथे दिनांक 14 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नूतन सरपंच यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमावर बोलताना त्यांचा प्रयत्न केविलवाणा आहे हास्यास्पद असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुका अध्यक्ष एडवोकेट शरद जामदार यांनी केली होती या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे उत्तर देताना म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षांनी पहिल्यांदा आपल्या चष्म्याचा नंबर बदलावा व एकाच वेळी समोरा समोर कार्यक्रम घेऊन कोणाचे किती सरपंच आहेत हे जनतेला दाखवून द्यावे असा पलटवार केला त्याच बरोबर विरोधी पक्षाने दावा केलेल्या तालुक्यातील कचरवाडी निमगाव केतकी सरडेवाडी दगडवाडी आदी ग्रामपंचायत सरपंच हे सत्तेच्या दबावापोटी कार्यक्रमाला उपस्थित होते असे सांगितले होते त्यास उत्तर देताना कोकाटे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 41 ठिकाणी आपली निर्विवाद सत्ता आल्याचे दाखवून दिले असल्याने च विरोधी पक्षाच्या पायाखालील वाळू सरकल्यामुळे ते अशी बेताल वक्तव्य करीत आहेत अशी टीका केली अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करणाऱ्या तालुकाध्यक्षांनी समोरासमोर कार्यक्रम घेऊन आपले संख्याबळ दाखवावे असे आव्हान देखील हनुमंत कोकाटे यांनी विरोधी पक्षाला दिले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यावर तसेच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वर पूर्ण विश्वास असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने कौल दिला आहे हा कौल विरोधी पक्षांना पचनी न पडल्यामुळे ते अशी बेताल वक्तव्य करत आहेत खोटे बोल पण रेटून बोल असा भाजपचा वरपासून खालीपर्यंत अजेंडाच असल्याची खरमरीत टीका हनुमंतराव कोकाटे यांनी यावेळी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस वसंतराव आरडे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, सुभाष पवार-डरंगे सुभाष गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते
राजकारणातील राजहंस दत्तात्रय मामा भरणे
आम्हाला लाभलेला राजकारणातील राजहंस शेतकरी कुंटूबातील आमदार दत्तात्रेय भरणे मामा यांचा राजकीय घराण्याला राजकीय वारसा नसतानाही निष्ठावान कार्यकत्यापासून सामाजिक कामांना सुरवात करणारे आमदार दत्तात्रेय भरणे पक्षनिष्ठा, पारदर्शक कारभार व विकासकामे खेचून आणण्याची धमक असल्यामुळे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते आज आमदार, व मंत्रीपदाची शपथ घेतली. इंदापूरचे आ.दत्तात्रेय भरणे मामा शेतकरी कुंटूबातील साधे व्यक्तीमत्व म्हणून परिचित आहे. कुंटूबाला राजकारणातील घराणेशाहीचा वारसा नाही. केवळ पक्षनिष्ठा व विकासकामांच्या जोरावर आज मंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक व विश्वासू आमदार म्हणून त्यांची राज्यामध्ये ओळख आहे. १९९२ साली वयाच्या २२ व्या वर्षी भवानीनगरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालकपदापासून त्यांची सुरवात झाली. १९९६ साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बंकेचे संचालकपदी काम करण्याची संधी मिळाली. संचालक पदाच्या संधीचे सोने करुन शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न मार्गी लावले. २००१ साली जिल्हा बं...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा